ना भाई ना! राहुल टेवाटियाने एका षटकात पाच Six लगावल्यानंतर 'युवराज'लाही भरली होती धडकी

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला.

KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला. IPLमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा स्वतःचाच विक्रम आज RRनं मोडला. RRनं किंग्स इलेव्हन पंजाबवर ( KXIP) 4 विकेट्स राखून विजय मिळला.

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या.

लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले.

स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.

RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवंर चार खणखणीत षटकार खेचून सामना 14 चेंडूंत 27 धावा असा चुरशीचा बनवला. यानंतर शेवटच्या चेंडूवर देखील षटकार खेचतं राहुलनं 18व्या षटकात पाच षटकारांसह 30 धावा चोपल्या. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.

राहुल तटेवाटियाने एकाच षटकार खणखणीत चार षटकार मारल्यानंतर आतंरराष्ट्रीय टी- ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार लगावणाऱ्या भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला देखील धडकी भरली होती. युवराज सिंग ट्विट करुन म्हणाला की, मिस्टर राहुल टेवाटिया ना भाई ना! एक चेंडू मिस केल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत सहा षटकार न मारल्यामुळे युवाराजने राहुलचे आभार मानले आहे.

Read in English