RCB vs DC: एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम विराट कोहली करणार; दिग्गजांमध्ये मानाचं स्थान पटकावणार!

Indian Premier League ( IPL 2020) आज अव्वल स्थानासाठीची लढाई रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यात Dubai International Cricket Stadiumवर रंगणाऱ्या सामन्यात दोन्ही कर्णधारांचे लक्ष अव्वल स्थानाकडे असणार आहे.

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रविवारी सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) 34 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

प्रत्येकी चार सामने खेळलेले RCB आणि DC 6 गुणांसह मागोमाग आहेत. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल तो 8 गुणांसह अव्वल स्थानावर सरकेल.

पण, आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले आहे, ते विराट कोहलीच्या ( Virat Kohli) भीमपराक्रमाकडे. भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकाही फलंदाजाला न जमलेला विक्रम कोहलीच्या नावावर आज नोंदवला जाणार आहे.

IPL मध्ये सर्वाधिक 5502 धावांचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. IPL मध्ये 5500 धावा करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.

आजचा हा विक्रम खास ठरणार आहे. आज 10वी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरानं लिहिले जाईल.

सर्व प्रकारच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट 7व्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 285 सामन्यांत 8990 धावा आहेत.

आज त्यानं 10 धाव करताच ट्वेंटी-20त 9 हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनणार आहे. भारताचा रोहित शर्माच्या नावावर 8818 धावा आहेत, तर सुरेश रैनानं 8392 धावा केल्या आहेत.

ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत खिस गेल (१३,२९६ धावा), किएरॉन पोलार्ड (१०,२३८), ब्रेंडन मॅक्क्युलम (९,९२२), शोएब मलिक (९,९०६), डेव्हिड वॉर्नर (९,३१८) आनि अ‍ॅरोन फिंच (९,०८८) हे विराटच्या पुढे आहेत.

Read in English