IPL 2021त महेंद्रसिंग धोनी होणार मालामाल, IPLमध्ये १५० कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू; जाणून घ्या रोहित, विराटचा पगार!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) अग्रस्थानावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंत प्रवासात त्यानं सर्वाधिक १३७ कोटी पगार घेतला आहे आणि IPL 2021मध्ये तो आणखी एक विक्रम नावावर करणार आहे.

आयपीएलच्या पुढील पर्वात धोनी आयपीएलमध्ये १५० कोटी पगार घेणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) पुढील पर्वातही धोनीच संघाचे नेतृत्व करेल, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो १५० कोटींचा पल्ला ओलांडेल हे नक्की आहे.

व्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासात १५० कोटींचा पल्ला ओलांडणारा धोनी हा पहिलाच खेळाडू ठरणार आहे. धोनीनं पहिल्या तीन पर्वात १८ कोटी पगार घेतला. त्यानंतर पुढील तीन पर्वांत त्याचा पगार हा ८.२८ कोटी झाला.

२०१४ व २०१५ मध्ये त्यानं १२.५ कोटी प्रती पर्व घेतले. रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना त्यानं त्या दोन पर्वात २५ कोटी पगार घेतला.

२०१८च्या लिलावात CSKनं त्याला १५ कोटींत संघात कायम राखले. त्यानंतर त्यानं पुढील तीन पर्वात CSKकडून ४५ कोटी इतका पगार घेतला. आयपीएल २०२१ साठी मेगा ऑक्शन होणार नसल्यानं धोनीला यंदाही १५ कोटी पगार मिळणार आहे.

हा केवळ पगाराचा आकडा आहे. यात जर सामन्यातून पुरस्काररुपी मिळालेली रक्कम बेरीज केल्यात धोनी २०० कोटींचा पल्ला सहज पार करेल.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं आतापर्यंत १३१ कोटी इतका पगार घेतला आहे. मुंबई इंडियन्स त्याला १५ कोटी पगार देते. त्यामुळे तो यंदा १४६ कोटींपर्यंत पोहोचेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं आतापर्यंत १२६ कोटी पगार घेतला आहे. त्याला RCBनं यंद १७ कोटी दिले तर तो १४३ कोटींपर्यंत पोहोचेल.

सुरेश रैना व एबी डिव्हिलियर्स हे IPL 2021मध्ये १०० कोटी पगाराचा पल्ला ओलांडतील.