IPL Auction 2021 : आयपीएलच्या लिलावात १८ वर्षीय 'तरुणीची' हवा; ठरली सर्वात कमी वयाची Bidder!

Youngest Bidder Of IPL IPL Auction 2021 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठीच्या लिलावाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ( IPL Auction 2021) ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत.

IPL Auction 2021 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठीच्या लिलावाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ( IPL Auction 2021) ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत.

या ऑक्शनमध्ये कोणावर सर्वाधिक बोली लागते, अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) कोणता संघ आपल्या ताफ्यात घेतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतीलच... पण, ऑक्शनला सुरुवात होण्यापूर्वीच एका तरुणीनं हवा केली आहे. सोशल मीडीयावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे.

आयपीएलच्या लिलावासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज झाले आहेत आणि लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्या टीमसह सज्ज झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) च्या ताफ्यात दिसणारी तरूणी ही यंदाच्या आयपीएलमध्ये सहभाग घेतलेली सर्वात युवा सदस्य आहे.

जान्हवी मेहता ( Jahnavi Mehta) असे त्या तरुणीचं नाव आहे. अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता यांची ती कन्या आहे. ती प्रसिद्धीपासून कायम दूर राहिली आहे. १८ वर्षीय जान्हवीनं शिक्षणात घवघवीत यश मिळवलेलं आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये १० ए मिळवणाऱ्या दहा विद्यार्थ्यांमध्ये जान्हवीचा समावेश होता. नुकतंच तिनं लंडन स्कूलमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

जुही चावलाच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये काम करण्याची जान्हवीची अजिबात इच्छा नाही. तिला लेखक व्हायचे आहे आणि हे तिनं आधीच स्पष्ट केलं आहे.

जान्हवी मेहता हिला वरूण धवन आवडतो. जान्हवीनं मागील वर्षीही आयपीएलच्या ऑक्शनमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षीही ती सहभाग घेणार आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सचे अपडेट्स सोशल मीडियावर देत राहणार आहे.