World Record : RCBनं संघात कायम राखलं अन् एबी डिव्हिलयर्सनं १०० कोटींचं माप ओलांडलं!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनपूर्वी ( IPL 2021 Mini Auction) संघातील १० खेळाडूंना रिलीज केलं, तर १२ खेळाडूंना कायम राखले.

यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBनं समाधानकारक कामगिरी केली होती. त्यामुळे संघ व्यवस्थापनानं त्यांच्या बऱ्याच खेळाडूंना कायम राखले.

RCBनं एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याला कायम राखताच एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

आयपीएलच्या मागील मोसमात एबीनं ४५.४०च्या सरासरीनं ४५४ धावा चोपल्या. आयपीएलमध्ये एकूण १६९ सामन्यांत त्याच्या नावावर ४८४९ धावा आहेत.

एबीनं या लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि RCB अशा दोन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. २०११मध्ये त्याला RCBनं ५ कोटींत ताफ्यात दाखल करून घेतले.

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर - रिलीज खेळाडू : मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच,ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना, उमेश यादव

३५.९० कोटी शिल्लक- यातून त्यांना ९ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंना ताफ्यात घ्यायचे आहे.

डॅनिएल सॅम्स व हर्षल पटेल यांना दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड केले

रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे;

RCBनं एबीला संघात कायम ठेवताच दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूनं आयपीएलमध्ये १०० कोटींचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये १०० कोटी कमावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे.

महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आधीच १०० कोटींचा पल्ला पार केला आहे. चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी सुरेश रैनालाही कायम ठेवले आणि तोही १०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला.

डिव्हिलियर्सला सध्याच्या करारानुसार ११ कोटी प्रती पर्व मिळते. आतापर्यंत या लिगमधून एबीनं १०२ कोटी कमावले आहेत.