IPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये अनेक युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. IPLमध्ये दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना या युवा खेळाडूंना बरेच काही शिकायला मिळाले, मिळत आहे... सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यातल्या चुरशीच्या सामन्यात SRHने बाजी मारली. 162 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला 147 धावांपर्यंत मजल मारता आली.

दिल्लीला विजयासाठी 42 चेंडूंत 85 धावांची गरज होती. रिषभ पंत आणि शिमरोन हेटमायर यांच्यासाठी हे लक्ष्य सहज शक्य होतं, त्यात मार्कस स्टॉयनिससारखा मॅच विनिंग खेळाडू डग आऊमध्ये सज्ज होताच. डेव्हीड वॉर्नरनं ( David Warner) 14वे षटक टाकण्यासाठी थंगारसू नटराजन ( T Natarajan) याच्या हातात चेंडू सोपवला.

13व्या षटकात रिषभनं अभिषेक शर्मानं टाकलेल्या चेंडूंवर सलग दोन षटकार खेचले होते. नटराजननं पहिला चेंडू यॉर्कर टाकला आणि त्यावर DCला 1 धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर यॉर्करचा त्याचा प्रयत्न फसला आणि चौकार गेला. तिसरा ( 1धाव), चौथा ( 1 धाव), पाचवा चेंडू ( 1 धाव) आणि सहावा चेंडू ( 1 धाव) यॉर्कर टाकून त्यानं दिल्लीच्या फलंदाजांना हैराण केले.

29 वर्षीय गोलंदाजांनं खेळपट्टीवर उपस्थित असलेल्या दोन स्फोटक फलंदाजांना यशस्वीपणे रोखले. त्यामुळे DCवरील दडपण प्रचंड वाढले. त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि रशीद खान यांनी SRHसाठी मोहीम फत्त्ये केली. 18व्या षटकात नटराजननं पुन्हा अप्रतिम गोलंदाजी केली. मागच्या षटकात त्याने 10 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकात त्यानं 7 धावा दिल्या. शिवाय त्यानं मार्कस स्ट़ॉयनिसला बाद केले.

नटराजनची ही गोलंदाजी पाहून जगातील दिग्गजांनाही थक्क केले. सोशल मीडियावरही नटराजन ट्रेंड होऊ लागला. चेन्नईपासून 340 किलोमीटर लांब चिन्नाप्पमपट्टी येथील सालेम जिल्ह्यातील लहानश्या गावातील हा खेळाडू. त्याच्या गावात सुविधांचा अभाव असूनही स्वतःच्या कर्तृत्वावर नटराजन इथपर्यंत पोहोचला.

त्याची आई रोजंदारीवर काम करते, तर वडील साडी कंपनीत कामाला आहेत. नटराजनचा स्ट्रगल सुरू होता आणि त्याला तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये ( TNPL) खेळण्याची संधी मिळाली. Dindigul Dragons संघानं त्याला करारबद्ध केलं आणि त्यानंतर Lyca Kovai Kingsकडून तो खेळला. 2017मध्ये त्यानं ड्रॅगन्स संघाकडून सहा सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या.

किंग्स इलेव्हन पंजाबनं ( KXIP) त्याला 3 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. ''माझ्य़ा आई-वडिलांसाठी पक्क घरं बांधेन, असं त्यानं त्या IPLच्या पहिल्या करारानंतर म्हटले होते. त्याला KXIPकडून 6 सामन्यांत 2 विकेट्स घेता आल्या.

पुन्हा TNPLमध्ये त्यानं 8 सामन्यांत 12 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या यॉर्कर्सची तर तुफान चर्चा रंगली. श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यानं त्याच्यातील गुणवत्ता हेरली आणि सनरायझर्स हैरदाबादसाठी त्याची निवड केली. पण, 2018 व 2019मध्ये त्याला संधी मिळाली नाही.

या काळात त्यानं स्थानिक क्रिकेट गाजवलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं 11 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या. 2020च्या मोसमात त्यान 10 विकेट्स घेतल्या.

यंदाचा IPL मोसम गाजवण्यासाठी तो सज्ज आहे.