IPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) पराभूत करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) हा सलग दुसरा विजय असून त्यांनू IPL Point Table ( गुणतक्त्यात) 4 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले.

संयमी सुरुवातीनंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

पृथ्वी शॉने 64 धावा चोपल्या, तर शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्या अनुक्रमे 35 व 37 धावांचे योगदान दिले. दिल्लीनं 20 षटकांत 3 बाद 175 धावा केल्या. अखेरच्या षटकात 14 धावा चोपल्या गेल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सकडून फॅफ डू प्लेसिसची ( 43) एकाकी झुंज पाहायला मिळाली, तर कागिसो रबाडाच्या सर्वाधिक 3 विकेट्स, नॉर्ट्जेला दोन विकेट्स घेतल्या.

CSKने 20 षटकांत 7 बाद 131 धावा केल्या. DC ने हा सामना 44 धावांनी जिंकला. पण, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) मालकांच्या कुटुंबीयांमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं सर्वांचे लक्ष वेधले.

कोरोना व्हायरसमुळे स्टेडियमवर प्रेक्षकांना प्रवेश नाही. फक्त संघाचे सदस्य आणि मालक व त्यांच्या कुटुंबीयांना प्रवेश आहे. चेन्नई विरुद्धचा सामना पाहण्यासाठी DCचे मालक पार्थ जिंदाल यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

त्यातपैकी पार्थ जिंदाल यांची पत्नी अनुश्री यांनी सर्वांचे लक्ष वेधले. व्हाईट टॉप आणि जिन्स घालून DCच्या खेळाडूंना चिअर करणाऱ्या अनुश्री जिंदाल याही सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

त्यांचे फोटोही DCने त्यांच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. पार्थ आणि अनुश्री यांनी 2016 मध्ये विवाह केला. त्यांना एक वर्षांची मुलगी आहे. एप्रिल 2019मध्ये त्यांना कन्यारत्न झाला.