IPL 2020 Prize Money : आयपीएलच्या १३व्या पर्वातील विजेत्याचा आर्थिक तोटा; मिळणार निम्मीच बक्षीस रक्कम!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे, तर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या सामन्यातून दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे.

यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाला २०१९च्या आयपीएल विजेत्या संघाला मिळालेल्या बक्षीस रक्कमेतील ५०टक्केच रक्कम मिळणार आहे. २०१९मध्ये मुंबई इंडियन्सनं ( MI) जेतेपद पटकावलं होतं आणि त्यांना २० कोटी बक्षीस रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या विजेत्याला फक्त १० कोटी दिले जाणार आहेत.

आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते, असे बीसीसीआयनं सांगितले होते.

त्यात भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावामुळे Vivo ने टायटल स्पॉन्सरमधून माघार घेतली. Dream 11नं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली, परंतु ती Vivoच्या तुलनेत निम्म्या किमतीत.

त्यामुळे यंदाच्या विजेत्या संघाला १० कोटी दिले जाणार आहेत. शिवाय उपविजेत्याला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटीच मिळणार आहेत.

आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते, असे बीसीसीआयनं सांगितले होते.

उपविजेत्या संघाला १२.५ कोटी ऐवजी ६.२५ कोटी देण्यात येणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयनं पीटीआयला दिली होती.

क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी रुपये मिळणार आहेत.

Read in English