IPL 2020, CSK vs RR Latest News : MS Dhoni-Steve Smith यांच्यातल्या सामन्यात 'हे'पाच खेळाडू छाप सोडणार

IPL 2020, CSK vs RR Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. बेन स्टोक्स स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर असला तरी स्टीव्ह स्मिथ पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे वृत्त राजस्थान रॉयल्ससाठी ( RR) आनंददायी ठरले आहे.

असे असले तरी पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) आव्हान पेलविणे खडतर मानले जात आहे. जोस बटलर पहिल्या पहिल्या लढतीला मुकणार आहे. कारण तो आपल्या कुटुंबासह येथे वेगळा आलेला आहे. त्याला दुबईमध्ये ३६ तासांच्या अनिवार्य विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे. आजच्या सामन्यात पाच खेळाडू छाप पाडतील.

पीयूष चावला ( PIYUSH CHAWLA ) - IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत पीयूष 151 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.

रॉबिन उथप्पा ( ROBIN UTHAPPA ) - IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत उथप्पा 9व्या स्थानावर आहे. त्यानं 170 डावांत 4411 धावा केल्या आहेत. 2014च्या IPL मध्ये त्याने सर्वाधिक 660 धावा केल्या होत्या आणि KKRच्या जेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा होता.

स्टीव्हन स्मिथ ( STEVEN SMITH ) - IPL मध्ये स्मिथच्या नावावर 72 सामन्यांत 2022 धावा आहेत आणि त्यात एक शतक व 8 अर्धशतकांचा समावेश आहे.

शेन वॉटसन ( SHANE WATSON ) - IPLमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू म्हणून वॉटसन ओळखला जातो. त्याच्या नावावर 3579 धावा आहेत आणि त्यात 4 शतकांचा समावेश आहे. शिवाय त्यानं 92 विकेट्स घेतल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनी ( MS DHONI) - IPLमधील सर्वात यशस्वी फिनिशर असलेला धोनी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत आठव्या स्थानावर आहे. धोनीनं 171 डावांत 42.2 च्या सरासरीनं 4432 धावा केल्या आहेत. त्यात 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली CSKनं 2010, 2011 आणि 2018मध्ये जेतेपद पटकावले.