IPL 2020 : Aunty दुबईत जा आंद्रे रसेल चांगला खेळत नाहीए; KKRच्या खेळाडूची पत्नी ट्रोल, मिळालं सडेतोड उत्तर

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाने चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात अनपेक्षित पुनरागमन करताना विजय मिळवला. पण, त्यांच्या कामगिरीत सातत्य राहील, याची हमी कोणीच देऊ शकत नाही.

KKRचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल ( Andre Russell) याला IPL 2020मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या वादळी खेळीसाठी चाहते आतुर आहेत. पण, रसेलकडून अपेक्षित खेळी झालेली नाही.

त्यामुळे एका नेटिझन्सने सोशल मीडियावरून रसेलची पत्नी जेसिम लॉरा हिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण, तिनंही सडेतोड उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली.

इंस्टाग्रामवर लॉरानं एक फोटो पोस्ट केला. त्यावर आतिफ खान नावाच्या यूजर्सने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानं लिहिलं की,आंटी कृपया तुम्ही दुबईत जा... रसेल चांगल्या फॉर्मात नाही.''

त्यावर लॉरानं सडेतोड उत्तर दिले. तिनं लिहिलं की,आंद्रे रसेल त्याच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे.

आंद्रे रसेलची पत्नी त्याच्यासोबत आयपीएलसाठी प्रवास करते, परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे तिनं यूएईत न जाण्याचा निर्णय घेतला. नुकतीच ती आई बनली आहे.

आंद्रे रसेलनं IPL 2020त १२.५०च्या सरासरीनं ४ डावांत ५० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १३५ असा आहे. ४ डावांत त्यानं केवळ ४ षटकार खेचले आहेत आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत.

Read in English