India vs Australia, 3rd Test : सोशल डिस्टन्सिंग, PPE किट्स अन् बरंच काही; सिडनी कसोटीतील हे Photo पाहाच

India vs Australia, 3rd Test : बॉक्सिंग डे कसोटी पाहायला आलेल्या प्रेक्षकांपैकी एकाला कोरोना झाल्याचे वृत्त समजताच मेलबर्नमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच सिडनी कसोटीत प्रेक्षकांना मास्क घालणं बंधनकारक केलं आहे.

मेलबर्न सामन्यासाठी ग्रेट साऊदर्न स्टँड झोन ५ मध्ये असलेल्या प्रेक्षकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे.

बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियमवर ३० हजार लोकं उपस्थित होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सिडनी सामन्यासाठी केवळ २५ टक्केच प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क या नियमांचं पालन करणे त्यांना बंधनकारक आहे.

तिसऱ्या कसोटीचे पहिल्या सत्रातील बराचसा वेळ पावसामुळे वाया गेला. ऑस्ट्रेलियानं ७ षटकांत १ बाद २१ धावा केल्या आहेत.

मोहम्मद सिराजनं ऑसी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला ५ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले.