India Tour of Australia : आयसोलेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरुवात; पाहा फोटो
Published: November 14, 2020 04:21 PM | Updated: November 14, 2020 04:25 PM
भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका ही नेहमीच चाहत्यांच्या पसंतीत उतरणारी गोष्ट... ऑसी खेळाडूंची स्लेजिंग अन् भारतीय खेळाडूंचं त्यात तोडीचं उत्तर, यांनी नेहमीच चर्चेला विषय दिला. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर यंदाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या या दौऱ्यावर भारतीय संघाकडून सर्वांना प्रचंड अपेक्षा आहेत.