ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...

पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे आणि तिथे त्यांना एकामागोमाग अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला स्पॉन्सर मिळेनासा झालाय आणि त्यामुळे त्यांना आपल्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानचा संघ येथे तीन कसोटी व तीन ट्ंवेटी-20 सामने खेळणार आहे, परंतु हे सामने पाकिस्तानात दाखवले जाणार नाही.

पाकिस्तानमधील स्थानिक ब्रॉडकास्टर पीटीव्हीनं या मालिकेचे सामने दाखवण्यासाठी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरकडून आकारली जाणारी रक्कम देण्याइतके पैसे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानात ही मालिका प्रक्षेपित होऊ शकणार नाही.

पीटीव्ही हे सरकारी नेटवर्क आहे. हे नेटवर्क पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवते. पण, त्यासाठीची लिंक इंटनॅशनल ब्रॉडकास्टर्सकडून खरेदी केली जाते. त्याबदल्यात पीटीव्हीला काही रक्कम इंटनॅशनल ब्रॉडकास्टर्सना द्यावी लागते.

सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे आणि तिच अवस्था पीटीव्हीचीही आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या सामन्यांसाठी त्यांच्याकडे पैसेच उरलेले नाहीत.

केवळ याच मालिकेसाठीचे पैसे त्यांना द्यायचे नाहीत, तर यापूर्वीच्या मालिकेचे पैसेही त्यांनी अजून दिलेले नाहीत. त्यामुळे हे कर्ज फेडत नाही, तोपर्यंत इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर पाकिस्तानच्या सामन्याची लिंक पीटीव्हीला देणार नाहीत.

आता पीटीव्हीनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे ( पीसीबी) मदत मागितली आहे. पीसीबीनंही त्यांना स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यास सांगून हात झटकले आहेत.

त्यात आता त्यांना पुढील काही आठवडे एका ट्रॅव्हेल लॉजमध्ये रहावे लागणार आहे. पाकिस्तानातील एका पत्रकारानं ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.