DC vs KKR Latest News : क्रिकेटसाठी आर्किटेकची नोकरी सोडणारा वरूण चक्रवर्थी आहे तरी कोण?

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सनी ( Kolkata Knight Riders) पराभवाची चव चाखवली. KKRच्या फलंदाजांनी त्यांची भूमिका चोख पार पाडल्यानंतर वरुण चक्रवर्थीनं DCचा निम्मा संघ माघारी पाठवला. कोलकाताना मोठ्या फरकानं हा सामना जिंकून प्ले ऑफसाठीच्या चौथ्या स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे.

कोलकाताच्या ६ बाद १९४ धावांचा पाठलाग करताना दिल्लीला ९ बाद १३५ धावा करता आल्या. चक्रवर्थीनं यंदाच्या मोसमात एका सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा पहिला मान पटकावला. कोलकाताना हा सामना ५९ धावांनी जिंकला. वरुण चक्रवर्तीनं ४ षटकांत २० धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. कोलाकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरीन ( २०१२) याच्यानंतर पाच विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.

अनकॅप भारतीय खेळाडूनं एका सामन्यात पाच विकेट घेण्याची ही दुसरी वेळ. २०१८मध्ये अंकित राजपूतनं किंग्स इलेव्हन पंजाबसाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५/१४ अशी कामगिरी केली होती.

वरूणनं आज २० धावात देताना ५ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये पाच+ विकेट घेणारा तो तिसरा लेग स्पिनर ठरला. यापूर्वी अॅडम झम्पा ( ६/१९ वि. सनरायझर्स हैदराबाद) आणि अनिल कुंबळे ( ५/५ वि. राजस्थान रॉयल्स) यांनी अशी कामगिरी केली.

दिल्ली कॅपिटल्सचा धक्के देणारा वरूण चक्रवर्थी आहे तरी कोण?

कर्नाटकच्या बिदर गावात २९ ऑगस्ट १९९१मध्ये त्याचा जन्म झाला.

१३ वर्षांचा असताना वरुणनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या १७व्या वर्षापर्यंत तो यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळत होता. पण, त्याला अनेक स्पर्धांमध्ये नकार मिळाला. त्यानंतर त्यानं क्रिकेटर होण्याचे स्वप्न सोडले आणि चेन्नईच्या SRM University आर्किटेक्चरची डीग्री घेतली.

पाच वर्षांच्या कोर्सनंतर तो फ्रिलान्सर आर्किटेक म्हणून काम करत होता, परंतु टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पुन्हा तो या खेळाच्या प्रेमात पडला. त्यानं आर्किटेकची नोकरी सोडली आणि CromBest Cricket Club मध्ये गोलंदाज म्हणून सहभागी झाला. पण, दुखापतीनं त्याला घेरलं.

चेन्नईच्या लीगमध्ये ज्युबली क्रिकेट क्लबनं त्याला करारबद्ध केलं. २०१७-१८च्या मोसमात त्यानं वन डे क्रिकेटमध्ये ८.२६च्या सरासरीनं ३१ विकेट्स घेतल्या. तामिळनाडू क्रिकेट लीगमध्ये २०१८मध्ये त्यानं सिएचेम मधुराई पँथर्सचे प्रतिनिधित्व केलं.

२०१८मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबनं ८.४ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात त्यानं २५ धावा देऊन नकोसा विक्रम नावावर केला. २०२०मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं करारबद्ध केलं