६ लोकप्रिय अभिनेत्री फक्त स्टार नाही तर उद्योजक आहेत, पाहा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:03 IST
1 / 10आपण बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या राहणीमानाकडे बघून आवाक होतो. एवढं श्रिमंती जीवन कसं जगतात? असा प्रश्न आपल्याला पडतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? या कलाकरांच यश फक्त चित्रपटांतून मिळणाऱ्या कमाईवर निर्भर नाही. ते इतरही विविध क्षेत्रात नशिब आजमावत असतात.2 / 10अनेक अभिनेत्रींचा देखील या यादीत समावेश होतो. याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे3 / 10या नावाजलेल्या अभिनेत्री उद्योजकसूद्धा आहेत. त्यांचे व्यवसाय जगभरात नावारूपासही आले आहेत.4 / 10महिलांनी उद्योग क्षेत्रात उतरावे यासाठी या अभिनेत्री महिलांना उत्तेजित करत असतात.5 / 10१. बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या दिपिका पदूकोणनी 'Ka' प्रोडक्शन हाऊस सुरू केले. मिंत्राच्या साईटवरसूद्धा तिचे कपड्यांचे कलेक्शन आहे. तिचे अजून छोटे-मोठे स्टार्टअप्स आहेत.6 / 10२. प्रियांका चोप्रा एक नावाजलेली कलाकार तर आहेच, पण ती एक उत्तम उद्योजक आहे. तिने 'अनॉमली' नावाचा एक हेअरकेअर ब्रँड सुरू केला. जो खूपच यशस्वी झाला.7 / 10३. अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव फार मेहनतीने घडवले आहे. ती एक ऑलराऊंडर उद्योजक आहे. तिने २०१४ साली 'क्लिन स्लेट' नावाची प्रोडक्शन कंपनी सुरू केली. आता मिंत्रावर 'नुश' नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँडदेखील सुरू केला आहे.8 / 10४. आलिया भटने वयाच्या विशीतच मोठे पल्ले गाठले आहेत. 'इड-ए-मामा' नावाचा कपड्यांचा ब्रँड तिने सुरू केला होता. आता तिने लहान मुलांसाठी 'फस्टक्राय' नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.9 / 10५. एव्हरग्रिन सौंदर्यवती मलायका अरोरा एक फिटनेस फ्रिक आहे. हे आपल्याला माहितीच आहे. योगासने करा, असा सल्ला ती सतत देत असते. तिने 'दिवायोगा' नावाचा योगा स्टुडिओ सुरू केला. ती एका क्लोदिंग बिझनेसचीसुद्धा पार्टनर आहे.10 / 10६. प्रिती झिंटा प्रिती झिंटा एकेकाळी बॉलिवूडची क्युटगर्ल म्हणून प्रसिद्ध होती. तिने चित्रपटांत काम करायचे सोडल्यापासून ती एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. ती आयपीएल मधील 'किंग्ज इलेव्हन पंजाब' या गटाची मालकिण आहे. तिचे स्वत:चे 'पी.झेड.एन.झेड' नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे.