Tulsi wedding in Hullare Vasti with enthusiasm | हुल्लारे वस्तीवर उत्साहात तुळशी विवाह

सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील तुळशी विवाह सोहळा.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पडला.

नायगाव : वेळ सायंकाळची...सनईचे मंगलमय स्वर...अंगणात नातेवाइकांची धावपळ....शुभमंगल सावधानचे....भटजींचे स्वर....अंगावर पडणाऱ्या फुलांच्या अक्षदा... फटाक्यांची होणारी आतषबाजी...अशा आनंदी वातावरणात जायगाव-सिन्नर रस्त्यावरील हुल्लारे वस्तीवर तुळशी विवाह पार पडला.

दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून सुरू होणाऱ्या तुळशी विवाहाचा समारोप त्रिपुरी पौर्णिमेला होतो. पौर्णिमेचे औचित्य साधत सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील नंदु हुल्लारे यांनी मोठ्या थाटात विवाहाचे आयोजन केले होते. रविवारी सायंकाळी अंगणात आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेल्या मंडपास केलेली विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सायंकाळी ७ वाजता वधू पिता नंदू व माता सुरेखा यांनी वधू (तुलसी)ला सजवून मांडवात आणले. वर कृष्ण म्हणून उभ्या केलेल्या उसाला सजविण्यात आले होते. अर्जुन दिघोळे व श्रीकृष्ण गिते यांनी अंतरपाट धरून मांडवात उभे होते.

वर-वधूच्या व-हाडी मंडळीच्या भूमिकेत समस्त जायगावकर मांडवात स्तानापन्न होते. शुभमंगल सावधान मंगलाष्टक होताच उपस्थितानी अक्षदा म्हणून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. तुळशी विवाह होताच फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी ग्रामस्थांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

दरवर्षी हुल्लारे कुटुंब हे तुळशी विवाह मोठ्या थाटात साजरे करतात. या वर्षीही त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पडला.

 

Web Title: Tulsi wedding in Hullare Vasti with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.