ओतूर धरण प्रकल्पासाठी ४० कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:12 IST2020-08-25T23:11:05+5:302020-08-26T01:12:41+5:30
कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडी-अडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात व ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई येथे मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील. समवेत नितीन पवार, कौतिक पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, संजय देवरे, मावजी गायकवाड, संतोष देशमुख आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडी-अडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात व ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
ओतूरसह जलसंपदा विभागातील सिंचन योजनांसंदर्भात जयंत पाटील यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील यांनी हे निर्देश दिलेत. यावेळी आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी झूम अॅपद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
यावेळी पाटील यांनी कळवण मतदारसंघातील लघुपाट बंधारे प्रकल्प ओतूर, दुमी मध्यम बृहत ल. पा. प्रकल्प (पार प्रकल्प) श्रीभुवन लघु पाटबंधारे योजना सुरगाणा तसेच जलसंपदा विभागाच्या विविध योजनांबाबत झालेल्या कार्यवाहीची क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यात प्रामुख्याने यावेळी कौतिक पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, संजय देवरे, रविकांत सोनवणे, संतोष देशमुख उपस्थित होते. सुळे उजव्या कालव्याची पाहणी करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सुळे उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असल्यामुळे २१ किमी पाटविहीर शिवारापर्यंत पूरपाणी सोडण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी यावेळी बैठकीत केली. त्यावेळी कालव्याला गळती असल्यामुळे पाणी पोहोचणार नाही, असे सांगितले. कालवा लाभक्षेत्रातील शेतकºयांना पाण्याचा अद्याप लाभ मिळाला नसल्याचे पवार यांनी पाटील यांच्या निदशर्नास आणून दिले. त्यामुळे पाटील यांनी मुख्य अभियंता यांना तत्काळ सुळे उजव्या कालव्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.