भाजीपाला साठवण्यासाठी शुन्य ऊर्जा शीतकक्षवर प्रात्यक्षिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:53 IST2020-09-07T14:52:22+5:302020-09-07T14:53:18+5:30

नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Demonstration activities on zero energy refrigeration for storing vegetables | भाजीपाला साठवण्यासाठी शुन्य ऊर्जा शीतकक्षवर प्रात्यक्षिक उपक्रम

भाजीपाला साठवण्यासाठी शुन्य ऊर्जा शीतकक्षवर प्रात्यक्षिक उपक्रम

ठळक मुद्देग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यशाळा

नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यशाळा अंतर्गत भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी गावातील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतकक्ष याची निर्मिती, त्याचा वापर आणि फायदे याविषयी माहिती देण्यात आली. शून्य ऊर्जा शीतकक्षाची उभारणी विट व वाळुच्या सहाय्याने करण्यात आली होती. त्यामुळे फळे व भाजीपाला जास्त काळ ताजा राहण्यास मदत मिळते. शीतकक्षामुळे पोषणमूल्ये टिकून राहण्यास मदत होत असल्याचे कृषीदूत शेळके यांनी सांगितले.यासाठी कुठल्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही व खर्चही कमी लागतो. या प्रात्यक्षिकासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ पी. एन. रसाळ, कार्यक्रम समन्वयक बी. टी. कोलगणे, केंद्रप्रमुख डी. के. काठमाळ, विषय तज्ञ आर. वी. माने, कार्यक्रम अधिकारी सी. व्ही. मेमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेळके वस्तीवर कृषीदूत केतन शेळके यांनी भाजीपाला साठवण्या संदर्भात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याप्रसंगी शेतकरी बांधव
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

Web Title: Demonstration activities on zero energy refrigeration for storing vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.