नाशिक विभागात कोरोनामुक्तीचे प्रमाण ८१.१४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:31 PM2020-09-20T22:31:04+5:302020-09-21T01:34:12+5:30

नाशिक : नाशिक विभागातील पाचही जिल्'ांत कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. विभागात कोरोनामुक्त होण्याचे सरासरी प्रमाण ८१.१४ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.०६ टक्के इतका आहे. नाशिक विभागात कोरोनाबाधितांचे लक्षण वाढत असले तरी पाचही जिल्'ात चाचण्यादेखील वाढल्या आहेत. विभागात आत्तापर्यंत ५ लाख ७५ हजार संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले.

Coronation release rate in Nashik division is 81.14 percent | नाशिक विभागात कोरोनामुक्तीचे प्रमाण ८१.१४ टक्के

नाशिक विभागात कोरोनामुक्तीचे प्रमाण ८१.१४ टक्के

Next
ठळक मुद्देसव्वा लाख रुग्ण बरे : मृत्युदर २.०६ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क,
नाशिक : नाशिक विभागातील पाचही जिल्'ांत कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. विभागात कोरोनामुक्त होण्याचे सरासरी प्रमाण ८१.१४ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.०६ टक्के इतका आहे. नाशिक विभागात कोरोनाबाधितांचे लक्षण वाढत असले तरी पाचही जिल्'ात चाचण्यादेखील वाढल्या आहेत. विभागात आत्तापर्यंत ५ लाख ७५ हजार संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यात १ लाख ५८ हजार ४५३ म्हणजेच ३३.४५ टक्के इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर उपचाराअंति १ लाख २८ हजार ५८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच विभागात कोरोनामुक्तीचे प्रमाण ८१.१४ टक्के इतके आहे. पाचही जिल्'ात एकूण ३ हजार २६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदर २.०६ टक्के इतका आहे. नाशिक विभागात आत्तापर्यंत २६ हजार ६०४ रुग्ण उपचार घेत आहेत.
विभागात गेल्या चोवीस तासांत ३ हजार ५ रुग्ण बरे झाले. ३ हजार १ नव्या रुग्णांची भर पडली आणि ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्यांपैकी तीन लाख ११ हजार ७९ जणांचे अहवाल नकारात्मक आले, तर ११४२ जणांचे नमुने अनिर्णित राहिले. अद्याप अडीच हजार व्यक्तींचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. विभागात नाशिक जिल्'ात सर्वाधिक ६२ हजार ५०७ रुग्ण आढळले आहेत. यात ५१ हजार २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १५५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्'ात १० हजार ९१ रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ात रुग्णसंख्या ४४ हजारांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, त्यातील ३२ हजार ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्'ात सध्या नऊ हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ात बाधितांची संख्या ११ हजार ५०५ इतकी झाली असून, यात १० हजार ९७ जण बरे झाले आहेत, तर सध्या १ हजार ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्'ात आतापर्यंत ३६ हजार ३७७ रुग्ण आढळले असून, त्यात ३१ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ५६६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४२५३ रुग्ण उपचार घेत आहेत. विभागात सर्वांत कमी रुग्ण असलेल्या नंदुरबार जिल्'ात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांपर्यंत पोहोचत आहे. या जिल्'ातील तीन हजार ३३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १०८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १ हजार ३२१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
विभागात सध्या २६ हजार ६०४ व्यक्ती उपचार घेत आहेत. यातील पाच हजार ७०५ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत, तर ३० हजार ९५७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. रुग्णालयातील खाटा मिळण्यात अडचणी, सौम्य लक्षणे आणि घरीच उपचाराची सोय अशा विविध कारणांमुळे हे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

नाशिक विभागात आतापर्यंत विविध यंत्रणांनी घेतलेल्या कोरोना चाचणीत तीन लाख ११ हजार ७९ जणांचे अहवाल नकारात्मक आले, तर १ हजार १४२ संशयित रुग्णांचा अहवाल अनिर्णित आहेत आणि सुमारे अडीच हजार संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. विभागात सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्'ात असून, ही संख्या ६२ हजार ५०७ रुग्ण इतकी आहे.

 

Web Title: Coronation release rate in Nashik division is 81.14 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.