Administrative system in Dindori ready | दिंडोरीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज
दिंडोरीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज

दिंडोरी : दिंडोरी-पेठ विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) निवडणूक होत असून, सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, एकूण ३२२ केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले यांनी दिली. दिंडोरी-पेठ विधानसभा अंतर्गत एकूण ३२२ मतदान केंदे्र असून, एकूण तीन लाख तेवीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३२२ मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी असे एकूण राखीवसह १८२९ कर्मचारी कार्यरत असतील. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस शिपाई असेल. एकूण ९ पोलीस अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. तर ३२२ केंद्रांवर ३९ झोनल अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे.
-------------------
सखी मतदान केंद्र आकर्षण
दिंडोरी येथील क्र ां. व्ही. एन. नाईक महाविद्यालय या केंद्र क्र मांक २०७ या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष ते शिपाई, पोलीस कर्मचारी या सर्व महिला असून, स्पेशल सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, प्रथमच महिला केंद्राध्यक्ष म्हणून मीरा खोसे, संध्या साखरे, स्वाती केकाण, नीलिमा बोराडे, रीता दंडगव्हाळ आदींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्राचे विशेष आकर्षण मतदारांना असणार आहे. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील मतदान केंद्रावर सजावट करून एक आयडियल आदर्श मतदान म्हणून असणार आहे. या केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच एकूण ३२२ मतदान केंद्रांपैकी ३४ मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीने लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे. निवडणूक प्रक्रि या सुरळीत पार पाडण्यासाठी प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, पेठचे तहसीलदार संदीप भोसले, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे आदी प्रयत्नशील आहेत.


Web Title: Administrative system in Dindori ready
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.