३८६ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:19 PM2020-02-25T22:19:19+5:302020-02-26T00:15:29+5:30

मालेगाव : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ३८६ कोटींच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूने साडेआठ कोटींची वाढ सुचवित व किरकोळ बदल करून ...

2 crore budget | ३८६ कोटींचे अंदाजपत्रक

मालेगाव मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत चर्चा करताना खालीद परवेझ, सदस्य अस्लम अन्सारी, फकिरा शेख व अधिकारी.

Next
ठळक मुद्देमालेगाव महापालिका : स्थायी समितीने दिली मंजुरी

मालेगाव : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ३८६ कोटींच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूने साडेआठ कोटींची वाढ सुचवित व किरकोळ बदल करून अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मंजूर झालेले अंदाजपत्रक महासभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.
१२ फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला कुठलीही करवाढ न करता कर वसुलीत दहा टक्क्यांची वाढ सुचवली होती. ३८६ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. मंगळवारी (दि.२५) स्थायी समिती सभागृहात अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सभापती डॉ. खालीद परवेज यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. दीर्घकाळ झालेल्या चर्चेनंतर काही दुरुस्ती सुचवत स्थायी समितीने अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. मंजुर झालेले अंदाजपत्रक महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. या बैठकीत मुख्य लेखापाल कमरुद्दीन शेख यांनी अंदाजपत्रकातील तरतुदीविषयी मंजुरी दिली. चर्चेत स्थायी समिती सदस्य अस्लम अन्सारी, फकीरा शेख आदींसह सदस्यांनी सहभाग घेतला.
बैठकीत उत्पन्नाच्या बाबी तपासण्यात आल्या. उत्पन्नात सुमारे साडेआठ कोटींची वाढ स्थायी समितीने सुचवली आहे, तर खर्चाची बाजू कशी कमी करू शकतो यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गिरणा धरणावरील पंपिंग स्टेशन येथे सोलर सिस्टीम उभारण्यासाठी निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्याची सूचनाही स्थायीने केली आहे.

Web Title: 2 crore budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.