कंधार तालुक्यात १०४ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:41 PM2019-09-06T18:41:51+5:302019-09-06T18:44:44+5:30

गावात सामाजिक एकोपा असल्याचे आले समोर .

'One Ganapati in one village' activity by 104 villages in Kandhar taluka | कंधार तालुक्यात १०४ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम

कंधार तालुक्यात १०४ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम

Next
ठळक मुद्देकंधार पोलीस ठाण्यांतर्गत ११८ गावे, ७७ ग्रामपंचायती पैक्की ६२ गावांत संकल्पनाउस्माननगर पोलीस ठाण्यात ६४ गावे व ५२ ग्रामपंचायती पैक्की ४२ गावांत संकल्पना

कंधार : कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ११८ गावे व ७७ ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. त्यातील ६२ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला. तर उस्माननगर ता.कंधार येथील पोलीस ठाण्यांतर्गत ६४ गावे व ५२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यातील ४२ गावात ही संकल्पना राबविण्यात आली.त्यामुळे गावात सामाजिक एकोपा असल्याचे यातून समोर आले.

कंधार पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या ग्रामीण भागातील गावात १५५ श्री ची  स्थापना करण्यात आली. तर कंधार शहरात ३२ गणेश मंडळांने श्रीची स्थापना केली आहे.  त्यात ग्रामीण भागात ६२ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला़ त्यात गोगदरी, लालवाडी, गांधीनगर लिंबाजीचीवाडी, गुलाबवाडी, गुलाबवाडी तांडा, सुजानवाडी, गणातांडा, जंगमवाडी, संगमवाडी, जांभुळवाडी, आनंदवाडी, बाळंतवाडी, बिजेवाडी, पानशेवडी, घागरदरा, पिंपळ्याचीवाडी, हरबळ, ब्रम्हवाडी, टोकवाडी, वाखरडवाडी, सोमसवाडी, मुंडेवाडी, केवळातांडा, मानसिंगवाडी, चोळीतांडा, फकीर दऱ्याची वाडी, भोजुचीवाडी, कंधारेवाडी, पट्टाचातांडा, मादाळी, नावंद्याची वाडी, शेल्लाळी, मसलगा, शिरशी (खु), शिरशी(बु), नारनाळी, कळका, गोणार, जाकापुर, देवईची वाडी, राहटी, कौठा, तेलुर, येलुर, जुना शिरूर, चुडाजीचीवाडी, नेहरूनगर, आनंदवाडी, भेंडेवाडी, कारतळा, नागलगाव, गुंटूर, महालिंगी, रामानाईकतांडा, हाटक्याळ, बोळका,  दैठणा, मरशिवणी, उमरगा(खो), गुट्टेवाडी, श्रीगणवाडी आदी गावांचा  समावेश आहे. 
कंधार शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस कर्मचारी, ५ महिला पोलीस कर्मचारी, ४० पुरुष होमगार्ड, १० महिला होमगार्ड, १० ट्रॅकिंग फोर्सचे जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, श्यामसुंदर छत्रकर, नामदेव रेगीटवाड, विश्वनाथ नामपल्ले, मगदुम सय्यद आदीसह तंटामुक्ती अध्यक्ष, गाव पातळीवरील पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी आदींनी पुढाकार घेतला.

उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत ९९ ठिकाणी स्थापना
उस्माननगर ता.कंधार  पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ९९ ठिकाणी श्रीची स्थापना  करण्यात आली आहे. त्यात ४२ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यात गोंविदतांडा,  हिदोंंळा, कामळज, जोशीसांगवी, काजाळातांडा, परसरामतांडा, काजाळतांडा (प.क), करमाळा, मोकनेवाडी, शिराढोणतांडा, वाळकी(बु), हातणी ,वाळकी(खु), कापशी (खु), धाज(खु), पिंपळदरी, वडगाव, उमरा, गूंडा, दिंडा,  डोलारा, गोळेगाव, भंडारकुमठयाचीवाडी, भूकमारी, सावळेश्वर, दहिकळंबा, तेलंगवाडी, कलंबर (खु), कौडगाव, गुंडेवाडी , चिंचोली, लाठ(खु), दाताळा, राऊतखेडा, धानोरा कवठा, धाज (बु), डोणवाडा, शंभरगाव, सुगाव, बामणी(प.क), धनज(बु), येळी आदी गावांचा समावेश आहे. 

Web Title: 'One Ganapati in one village' activity by 104 villages in Kandhar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.