नागपुरात ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:16 PM2019-09-16T12:16:02+5:302019-09-16T12:16:35+5:30

सोमवारी महाल येथे भोसले राजवाड्यात या ऐतिहासिक मस्कऱ्या  गणपतीचे आगमन होत आहे. १६ रोजी दुपारी ३.३० वाजता चितार ओळ महाल येथून वाजतगाजत मिरवणूक काढून सिनियर भोसला पॅलेस येथे आगमन होईल.

Arrival of Historical Ganpati in Nagpur | नागपुरात ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे आगमन

नागपुरात ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील प्राचीन परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीमंत राजे खंडोजी भोसले ऊर्फ चिमणबापू यांनी १७५५ मध्ये राजवाड्यात मस्कऱ्या म्हणजेच हाडपक्या गणपतींची स्थापना केली होती. तेव्हापासून ही परंपरा पाळली जाते.
गणेशोत्सवानंतर या मस्कऱ्या गणपतीचे आगमन होते. या परंपरेला यावर्षी २६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळीही येत्या सोमवारी महाल येथे भोसले राजवाड्यात या ऐतिहासिक मस्कऱ्या  गणपतीचे आगमन होत आहे. १६ रोजी दुपारी ३.३० वाजता चितार ओळ महाल येथून वाजतगाजत मिरवणूक काढून सिनियर भोसला पॅलेस येथे आगमन होईल. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी विधिवत स्थापना होणार आहे. भाविकांनी मस्कऱ्या गणपती स्थापनेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराजा आॅफ नागपूर ट्रस्टने केले आहे.

Web Title: Arrival of Historical Ganpati in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.