दलित शब्द व्यवहारात हवा - आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 06:10 AM2019-09-20T06:10:06+5:302019-09-20T06:10:19+5:30

दलित हा शब्द वापरण्यास मनाई करणे चुकीचे असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे.

The word Dalit should be practiced - remembered | दलित शब्द व्यवहारात हवा - आठवले

दलित शब्द व्यवहारात हवा - आठवले

Next

मुंबई : दलित हा शब्द वापरण्यास मनाई करणे चुकीचे असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. शासकीय नोंदींमध्ये जातीचा उल्लेख करताना दलित शब्द यापूर्वी वापरला जात नव्हता. त्यामुळे शासकीय नोंदींपुरते दलित शब्दाला मनाई ठीक आहे. मात्र, व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांत दलित शब्दाच्या वापरास मनाई करता कामा नये, असे आठवले म्हणाले.
शेकडो वर्षांची सामाजिक विषमता आणि त्याच्या वेदना ‘दलित’ या शब्दातूनच नेमकेपणाने प्रकट होतात. त्यामुळेच भारतीय दलित पँथर या संघटनेची स्थापना झाली. त्यामुळे दलित शब्द व्यवहारात असायलाच हवा, असे आठवले म्हणाले. महाराष्ट्र शासनाने सरकारी कागदपत्रांतून दलित शब्द वापरण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Web Title: The word Dalit should be practiced - remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.