खार येथे आगीत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:07 IST2021-09-24T04:07:58+5:302021-09-24T04:07:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खार पश्चिमेकडील गुरू गंगेश्वर मार्गावरील नूतन व्हिला बिल्डिंगमधील खोली क्रमांक २२९ मध्ये गुरुवारी रात्री ...

Woman dies in fire at Khar | खार येथे आगीत महिलेचा मृत्यू

खार येथे आगीत महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खार पश्चिमेकडील गुरू गंगेश्वर मार्गावरील नूतन व्हिला बिल्डिंगमधील खोली क्रमांक २२९ मध्ये गुरुवारी रात्री साडेसात वाजता आग लागली. या घटनेतील तीन महिलांची मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. यातील जखमी हेमा जगवाणी (४०) यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

येथील नूतन व्हिला बिल्डिंगमधील खोली क्रमांक २२९ मध्ये गुरुवारी रात्री साडेसात वाजता आग लागली. ही आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी आठ फायर इंजीन, सहा जेटी आणि अग्निशमन दलाचा फौजफाटा दाखल झाला होता. याशिवाय १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, पोलीस, महापालिका विभागीय कर्मचारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी दाखल झाले होते. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, साहित्य, डक्ट जळून खाक झाले. आग आणि धुरामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. या वेळी तीन महिलांची मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. मात्र हेमा जगवाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Woman dies in fire at Khar