‘नगरविकास’च्या बैठका वरुण सरदेसाई घ्यायचे?, भाजपा आमदाराच्या आरोपानं भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:16 AM2022-08-23T06:16:28+5:302022-08-23T06:17:04+5:30

नगरविकास खाते आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे होते; पण त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का?

Will Varun Sardesai take the meetings of Nagarvikas BJP MLAs allegation | ‘नगरविकास’च्या बैठका वरुण सरदेसाई घ्यायचे?, भाजपा आमदाराच्या आरोपानं भुवया उंचावल्या!

‘नगरविकास’च्या बैठका वरुण सरदेसाई घ्यायचे?, भाजपा आमदाराच्या आरोपानं भुवया उंचावल्या!

Next

मुंबई :

नगरविकास खाते आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे होते; पण त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का? असा सवाल करून भाजपचे नितेश राणे यांनी या विभागाचा आढावा, बैठकी आधीचे पर्यटन मंत्री आणि वरुण सरदेसाई घेत होते, असा आरोप केला. नगरविकासच्या फायली मातोश्रीवर जायच्या, वैभव चेंबरमध्ये जायच्या, असे ते म्हणाले.

राणे यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना आमदार संतप्त झाले. रवींद्र वायकर यांनी सदस्यांना नोटीस न देता कोणाचे नाव सभागृहात घेता येत नाही, असे सांगितले. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो फेटाळला. जी नावे राणे घेत आहेत ते सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे नाव घेता येते, 

Web Title: Will Varun Sardesai take the meetings of Nagarvikas BJP MLAs allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.