उद्यापासून विरार ते डहाणू १५ डब्यांची लोकल; ‘परे’वर १७ फेऱ्यांमध्ये वाढ, एसी लोकलचाही दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:26 IST2026-04-30T07:26:42+5:302026-04-30T07:26:42+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी १२ नवीन एसी लोकल सेवा सुरू करण्यात येत आहेत.

उद्यापासून विरार ते डहाणू १५ डब्यांची लोकल; ‘परे’वर १७ फेऱ्यांमध्ये वाढ, एसी लोकलचाही दिलासा
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ‘आयसीएफ’कडून १५ डब्यांच्या २ नवीन लोकल उपलब्ध होणार असून त्यापैकी १ दाखल झाली असून, यामाध्यमातून नॉन एसी लोकलच्या १७ फेऱ्या १ मे पासून वाढवण्यात येणार आहेत. तर विरार-डहाणू रोड मार्गावर प्रथमच १५ डब्यांच्या गाड्या सुरू करण्यात येणार आहे. यामुळे १५ डब्बा लोकलच्या फेऱ्या संख्या आता २२७ वरून २४४ होणार आहे. तसेच १२ एसी लोकल फेऱ्या देखील वाढवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १७ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या विरार - डहाणू मार्गावर धावणार असून उर्वरित ९ फेऱ्या चर्चगेट - विरार मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी १२ नवीन एसी लोकल सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत (सोमवार ते शुक्रवार) एसी लोकलची संख्या १३३ वरून १४५ होईल, तर शनिवार-रविवारी ही संख्या १०६ वरून ११८ पर्यंत वाढेल.