Vidhan sabha 2019 : तारासिंग म्हणतात मी मुख्यमंत्र्याचा नोकर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:46 AM2019-10-02T03:46:20+5:302019-10-02T03:46:36+5:30

मुलुंड विधानसभामध्ये २० वर्षापासून कार्यरत असलेले आमदार सरदार तारासिंग यांना वयाचे कारण देत, थांबण्यास सांगितले.

Vidhan sabha 2019: tarasingh says i am chief minister's servant ... | Vidhan sabha 2019 : तारासिंग म्हणतात मी मुख्यमंत्र्याचा नोकर...

Vidhan sabha 2019 : तारासिंग म्हणतात मी मुख्यमंत्र्याचा नोकर...

Next

मुंबई : मुलुंड विधानसभामध्ये २० वर्षापासून कार्यरत असलेले आमदार सरदार तारासिंग यांना वयाचे कारण देत, थांबण्यास सांगितले. आणि त्यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर बोलताना ’मी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नोकर आहे. ते म्हणाले कामाला लागा. म्हणून रथ सजवला. प्रचाराला लागलो. आता ते म्हणतात वय झालयं. तुम्ही थांबा म्हणून मी थांबतो आहे. पुढेही त्यांच्या आदेशानेच प्रचारात उतरणार असल्याचेही तारासिंग यांनी लोकमतशी बोलताना नमूद केले.

तारासिंग यांच्या म्हणण्यानुसार, ’मी मुलुंडला भाजपचा चेहरा दिला. मुलुंडकरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मी आजही त्याच जोमाने निवडणूक लढविण्याच्या तयारीत होतो. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनीच ग्रीन सिग्नल देत काम करायला सांगितले होते. म्हणून मी महिनाभरापूर्वीच तयारीला लागलो होतो. प्रचाराचा रथही मुलुंडमध्ये फिरला. अखेरच्या क्षणाला त्यांनी अन्य उमेदवाराला संधी दिली. त्यामुळे पक्षाच्या निर्णयाला मान देत मी प्रचारात सहभागी होईल.

तसेच, उमेदवारी नाकारल्यानंतर कॉंग्रेससह सर्व पक्षातून उमेदवारीसाठी कॉल येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मी त्यांना नकार दिला आहे. एवढी वर्ष पक्षासाठी काम केले. उमेदवारी दिली नाही म्हणून अन्य पक्षात जाणे योग्य नाही. म्हणून कुठेही न जाण्याचा निर्णय घेत आहे. वयाचा नियम हा सर्वासाठीच असावा असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Vidhan sabha 2019: tarasingh says i am chief minister's servant ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.