विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या दोन जणांना अटक

By Admin | Updated: February 20, 2016 02:59 IST2016-02-20T02:59:41+5:302016-02-20T02:59:41+5:30

लोकल डब्यात कथित मोबाइल चोरांना विवस्त्र करून बेदम मारहाण करणाऱ्या दोन जणांना अखेर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. हारीस शेख (२४) आणि नासीम शेख (२३) अशी अटक

Two people stabbed and stabbed | विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या दोन जणांना अटक

विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या दोन जणांना अटक

मुंबई : लोकल डब्यात कथित मोबाइल चोरांना विवस्त्र करून बेदम मारहाण करणाऱ्या दोन जणांना अखेर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. हारीस शेख (२४) आणि नासीम शेख (२३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मारहाणीची क्लिप दोन ते तीन वर्षांपूर्वीची असल्याचे समोर
आले. त्यानंतर या घटनेची
सखोल चौकशी केल्यानंतर परेल स्थानकात आणि लोकल डब्यात मारहाण झालेल्या दोनपैकी एक असलेल्या वासिम खानला ताब्यात घेऊन सविस्तर माहिती घेण्यात आली.
त्यावेळी अशी घटना झाल्याचे मान्य केल्यानंतर दादर रेल्वे पोलिसांत याची तक्रार दाखल करण्यात
आली होती. बराच तपास केल्यानंतर
दोन आरोपींना अटक करण्यात
रेल्वे पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी)

Web Title: Two people stabbed and stabbed