पालिकेच्या सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST2021-07-22T04:06:32+5:302021-07-22T04:06:32+5:30

मुंबई - पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काही विभागामधील नेतृत्वात बदल केला आहे. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या ...

Transfer of six Assistant Commissioners of the Corporation | पालिकेच्या सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या

पालिकेच्या सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई - पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काही विभागामधील नेतृत्वात बदल केला आहे. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर चार कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती देऊन त्यांच्यावर सहायक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पालिकेच्या काही विभागामध्ये सहायक आयुक्तांच्या जागा रिक्त होत्या. त्यानुसार सहायक आयुक्त किशोरी गांधी, संध्या नांदेडकर, विश्वास मोटे, पृथ्वीराज चव्हाण, मनीष वळंजू तसेच मृदुला अंडे यांची बदली करण्यात आली आहे. तर बाजार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ, टी-विभागाचे कार्यकारी अभियंता राजन प्रभू, एम-पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सागर आणि एल विभागाचे कार्यकारी अभियंता हरिनारायण साहू यांना बढती देत, त्या त्या विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

अशा झाल्या बदल्या..

सहायक आयुक्त विभाग

किशोर गांधी - अतिक्रमण निर्मूलन पूर्व व पश्चिम उपनगरे

संध्या नांदेडकर - आर/दक्षिण विभाग

मृदुला अंडे : आर/उत्तर विभाग

विश्वास मोटे : करनिर्धारण व संकलन विभाग

डॉ. पृथ्वीराज चव्हाण : के/पश्चिम विभाग

मनीष वळंजू : ई/विभाग

सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त भार...

कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ : बाजार विभाग

कार्यकारी अभियंता राजन प्रभू : ‘टी’ विभाग

कार्यकारी अभियंता सुरेश सागर : एम/पश्चिम

कार्यकारी अभियंता हरिनारायण साहू : ‘एल’ विभाग

Web Title: Transfer of six Assistant Commissioners of the Corporation