ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; मध्य, हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 04:10 IST2019-12-07T04:07:58+5:302019-12-07T04:10:02+5:30

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ दोन्ही दिशेकडील मार्गांवर मेगाब्लॉक असेल.

Trans Harbor, megablock tomorrow on the Western Railway; Comfort for commuters on the Central, Harbor route | ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; मध्य, हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; मध्य, हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

मुंबई : ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार, ८ डिसेंबरला ब्लॉक घेण्यात आला आहे, तर मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसेल.
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ दोन्ही दिशेकडील मार्गांवर मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत ठाण्याहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे व सकाळी १०.४५ ते दुपारी ३.३८ पर्यंत पनवेल/ बेलापूर/वाशीहून ठाणे दिशेकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सांताक्रुझ, माहिम स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील.

Web Title: Trans Harbor, megablock tomorrow on the Western Railway; Comfort for commuters on the Central, Harbor route