मोलकरणी निघाल्या चोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:17 IST2020-12-04T04:17:56+5:302020-12-04T04:17:56+5:30

पायधुनीतील घटना, १९ तोळ्यांंच्या दागिन्यांवर हात साफ पायधुनीतील घटना, १९ तोळ्यांंच्या दागिन्यांवर हात साफ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

The thief who went to the maid ... | मोलकरणी निघाल्या चोर...

मोलकरणी निघाल्या चोर...

पायधुनीतील घटना, १९ तोळ्यांंच्या दागिन्यांवर हात साफ

पायधुनीतील घटना, १९ तोळ्यांंच्या दागिन्यांवर हात साफ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पायधुनी परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरात दोन महिलांनी मोलकरीण म्हणून घरात प्रवेश मिळवला आणि घरातील तब्बल १९ तोळ्यांंच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

पायधुनी परिसरात राहणारे वसीम नूर मोहम्मद रोकाडिया (४५) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. त्यांचे खेळण्याचे दुकान आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन महिलांनी मोलकरीण म्हणून घरात प्रवेश मिळवला. पुढे घरातील दागिन्यांची माहिती मिळताच त्यांनी सोन्याो कडे, हार, अंगठी असे तब्बल ६ लाख ८४ हजार किमतीचे दागिने चोरून पळ काढला आहे.

ही बाब लक्षात येताच, रोकाडिया यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शबाना (२२) आणि नसरीन (२८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

....

मोलकरीण ठेवण्यापूर्वी माहिती घ्या...

गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे आपल्या घरात मोलकरीण ठेवताना त्यांची योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य खातरजमा केल्याशिवाय कुणालाही कामावर ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकड़ून वेळोवेळी करण्यात येत आहे.

Web Title: The thief who went to the maid ...