राज्यात काेराेनाचे ४३,५६१ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:40+5:302021-02-05T04:25:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १९ लाख ...

There are 43,561 active patients of Kareena in the state | राज्यात काेराेनाचे ४३,५६१ सक्रिय रुग्ण

राज्यात काेराेनाचे ४३,५६१ सक्रिय रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १९ लाख १५ हजार ३४४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या ४३ हजार ५६१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात सोमवारी १,८४२ रुग्णांचे निदान झाले असून, ३० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांचा आकडा २० लाख १० हजार ९४८ झाला असून, मृतांची एकूण संख्या ५०,८१५ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४२ लाख ५७ हजार ९९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.१० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७ हजार ९७१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २ हजार ३६० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

...................................

Web Title: There are 43,561 active patients of Kareena in the state