ठाण्यात मेट्रो - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 23:06 IST2015-04-24T23:06:15+5:302015-04-24T23:06:15+5:30

ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी पूर्ण करणारच अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी

Thane Metro - Chief Minister | ठाण्यात मेट्रो - मुख्यमंत्री

ठाण्यात मेट्रो - मुख्यमंत्री

ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी पूर्ण करणारच अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठाण्यात केली. त्यामुळे ठाणेकर सुखावले असून मेट्रो जाणार असलेल्या परिसरातील मालमत्तांचे भाव भडकण्याची चिन्हे आहेत.
संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाण्यात वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर हा फेस्टिव्हल आगळावेगळा आहे. अशाप्रकारच्या फेस्टिव्हलमधून भारतीय संस्कृती,कला जपली जाते. त्यामुळे राज्य सरकार अशाप्रकारच्या फेस्टिव्हलच्या कायम पाठिशी राहिल,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार प्रताप सरनाईक,संजय केळकर, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, ठाण्याचे महापौर संजय मोरे, सभागृह नेते नरेश म्हसके आदी मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Thane Metro - Chief Minister