टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने दाखल केले पुरवणी दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:09+5:302021-01-13T04:12:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने ३६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र सोमवारी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले. रिपब्लिक ...

Supplementary chargesheet filed by Crime Branch in TRP scam case | टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने दाखल केले पुरवणी दोषारोपपत्र

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने दाखल केले पुरवणी दोषारोपपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने ३६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र सोमवारी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले.

रिपब्लिक टीव्हीचे अधिकारी विकास खानचंदानी आणि बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगडीया, माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी प्रिया मुखर्जी, शिवेंदू मुळेलकर, रॉबर्ट वॉल्टर आणि शिव सुंदरम् हे फरार आरोपी असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.

काही वाहिन्या जाहिरातींद्वारे महसूल मिळविण्यासाठी टीआरपी वाढवून दाखवत असल्याची तक्रार बीएआरसी म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग (बार्क)ने पोलीस ठाण्यात केली होती. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा सहभागी असल्याचे नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हाेते.

.....................

Web Title: Supplementary chargesheet filed by Crime Branch in TRP scam case