Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:01 PM2022-04-12T12:01:17+5:302022-04-12T12:24:24+5:30

सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे

Sujat Ambedkar: What kind of rites were performed on the child? Prakash's question to MNS ameya khopkar | Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

googlenewsNext

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असे म्हटले होते. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी रस्त्यावर उतरण्याचं खुलं आव्हानच दिलं होतं. त्यासंदर्भात पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना सुजात आंबेडकर यांनी दंगली पेटवण्यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरुन, आता मनसेने त्यांच्यावर पलटवार केला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सुजातवर काय प्रकारचे संस्कार झालेत? असा सवालही मनसेनं विचारला आहे. 

सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरेंना लक्ष्य करुन सुजात यांनी हे विधान केले होते. त्यामुळे, मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सुजात यांच्यावर पलटवार केला आहे. तर, अविनाश जाधव यांनीही सुजातचा हा प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न असल्याचे म्हटलंय. ''मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे येईल. पण, जातीपातीचं राजकारण सुजातला शिकवू नका, अशा प्रकारचे संस्कार मुलाला देऊ नका, असा सल्ला मनसेचे अमेय खोपकर यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांकडून सुजातवर काय प्रकारचे संस्कार झालेत? असा प्रश्नही खोपकर यांनी विचारला आहे.

अविनाश जाधव यांचाही पलटवार

सुजातचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण, त्यांना माहितीय राज ठाकरे किंवा त्यांचे सुपुत्र अमित यांच्यावर बोलल्यास आपणस प्रसिद्ध मिळते. त्यामुळे, ते असं विधान करत असतात. बहुजनांची मुले असतात, मराठ्यांची असतात, सगळ्यांचीच मुले असतात. मीही असतो, माझ्यावरही 67 ते 68 गुन्हे दाखल आहेत. ते काय बोलतात ते त्यांनाच माहिती नाही, असे म्हणत सुजात यांच्या विधानावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले सुजात आंबेडकर

''आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितलयं की, दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. पण, त्यांच्या विधानावर प्रभावी होऊन, या दंगलीत सहभागी होतात ते जास्त करुन बहुजन पोरं असतात'', असं विधान सुजात आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना केलं होतं. 

तसेच, ''माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा लोकांना हनुमान चालिसा म्हणायला लावयची असेल तर बहुजन पोरांच्या आधी स्वत:च्या पोराला रस्त्यावर उतरवा. जर, तुम्ही स्वत:च्या पोराला रस्त्यावर उतरवणार नसाल तर दुसऱ्यांच्या पोराला रस्त्यावर उतरवू नका'', असेही सुजात यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: Sujat Ambedkar: What kind of rites were performed on the child? Prakash's question to MNS ameya khopkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.