स्ट्रॉ, सिपरसाठी स्टॅन स्वामींना पाहावी लागणार वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:46+5:302020-11-28T04:04:46+5:30

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी स्टॅन स्वामी यांना अटक करताना त्यांच्याकडून स्ट्रॉ, सिपर घेतला नसल्याचा दावा एनआयएने केला. त्यावर ...

Stan, wait for Stan Swami to see Sipar | स्ट्रॉ, सिपरसाठी स्टॅन स्वामींना पाहावी लागणार वाट

स्ट्रॉ, सिपरसाठी स्टॅन स्वामींना पाहावी लागणार वाट

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी स्टॅन स्वामी यांना अटक करताना त्यांच्याकडून स्ट्रॉ, सिपर घेतला नसल्याचा दावा एनआयएने केला. त्यावर ८१ वर्षांच्या स्टॅन स्वामी यांनी स्ट्रॉ, सिपर मिळविण्यासाठी पुन्हा अर्ज केला. आजारामुळे हात थरथरत असल्याने पाण्याचा ग्लास हातात धरणे शक्य नाही. स्वेटर मिळावा, असेही अर्जात नमूद केले. न्यायालयाने त्यावर एनआयएला ४ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे स्वामी यांना स्ट्रॉ, सिपरसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

-------------------------

Web Title: Stan, wait for Stan Swami to see Sipar