आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेवरून विशेष एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 04:10 AM2020-01-26T04:10:20+5:302020-01-26T04:15:02+5:30

वांद्रे टर्मिनसहून १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ वाजता सुटेल.

Special Express on Western Railway for Anganwadi Yatra | आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेवरून विशेष एक्स्प्रेस

आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेवरून विशेष एक्स्प्रेस

Next

मुंबई : आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून दोन विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत. वांद्रे टर्मिनस-थिविम (०९०९१) आणि थिविम-वांद्रे टर्मिनस या दरम्यान या विशेष एक्स्प्रेस धावतील. वांद्रे टर्मिनसहून १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ वाजता सुटेल. ही गाडी थिविम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल.
थिविम-वांद्रे टर्मिनस (०९०९२) विशेष एक्स्प्रेस थिविमहून १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.५० वाजता सुटेल. ती वांद्रे टर्मिनस येथे दुसºया दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड मार्गे जातील.

Web Title: Special Express on Western Railway for Anganwadi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे