.तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल - अजित पवार

By Admin | Updated: September 19, 2014 02:35 IST2014-09-19T02:35:16+5:302014-09-19T02:35:16+5:30

कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

So we have to think a different way - Ajit Pawar | .तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल - अजित पवार

.तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल - अजित पवार

मुंबई : राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही काँग्रेससोबत आघाडी करीत आहोत. पण कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 
विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल म्हटले होते. यावर अजित पवारांना प्रतिक्रिया विचारले असता, ते म्हणाले, त्यांच्या मतावर मी काय प्रतिक्रिया देणार? पक्ष म्हणून वेगळे लढण्याची पूर्ण तयारी आमचीदेखील आहे, परंतु धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे असे आम्हाला वाटते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भारतात परतल्या आहेत आणि जागावाटपाचा तिढा येत्या एक-दोन दिवसांत सुटेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
प्रतीक्षा संपत आली - तटकरे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, काँग्रेसने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, असा इशारा मी सोमवारी दिला होता. ती मुदत आता संपत आहे. तरीही आम्ही काँग्रेसच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहोत, लवकरच चर्चेने प्रश्न सुटेल असे वाटते.

 

Web Title: So we have to think a different way - Ajit Pawar