कार अपघातात सहा जण जखमी

By Admin | Updated: November 15, 2016 05:04 IST2016-11-15T05:04:21+5:302016-11-15T05:04:21+5:30

मुलुंड आणि कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात झालेल्या कार आणि टॅक्सीच्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.

Six people were injured in a car crash | कार अपघातात सहा जण जखमी

कार अपघातात सहा जण जखमी

मुंबई : मुलुंड आणि कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात झालेल्या कार आणि टॅक्सीच्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. जखमींवर मुलुंड तसेच राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरून कारने जात असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटला आणि गाडी जवळच्या दुभाजकाला धडकली. रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात चालकासह आतमध्ये बसलेला एक जण जखमी झाला असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापाठोपाठ कुर्ला येथून ३ प्रवाशांना लोकमान्य टिळक टर्मिनसकडे घेऊन जात असलेल्या टॅक्सीला अपघात झाला. यामध्ये टॅक्सीचालकासह ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Six people were injured in a car crash