श्याम मानव यांचेही ब्रेन मॅपिंग करा

By Admin | Updated: September 30, 2015 01:56 IST2015-09-30T01:56:07+5:302015-09-30T01:56:07+5:30

हिंसक कारवायांसाठी सनातन संस्था संमोहनशास्त्राचा वापर करीत असल्याचा श्याम मानव यांचा आरोप साफ चुकीचा असून,

Shyam Mann also has brain mapping | श्याम मानव यांचेही ब्रेन मॅपिंग करा

श्याम मानव यांचेही ब्रेन मॅपिंग करा

मुंबई : हिंसक कारवायांसाठी सनातन संस्था संमोहनशास्त्राचा वापर करीत असल्याचा श्याम मानव यांचा आरोप साफ चुकीचा असून, सनातनला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटे आरोप केले जात असल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. शिवाय, २ कोटींच्या सरकारी निधीसाठी श्याम मानव यांनी नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची शक्यता असल्याने त्यांचीही ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची मागणी सनातनने केली आहे.
पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी श्याम मानव यांच्यावर टीका केली. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी ब्रेन मॅपिंग करण्याची मानव यांची मागणी विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. २ कोटींच्या सरकारी निधीसाठी श्याम मानव यांनी नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे श्याम मानव यांचीच ब्रेन मॅपिंग चाचणी करा, अशी मागणी पुनाळकर यांनी केली.

Web Title: Shyam Mann also has brain mapping