‘राजगृह’बाहेर तोडफोड करणाऱ्याचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 03:36 IST2020-07-15T03:35:18+5:302020-07-15T03:36:58+5:30

७ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, घटनास्थळावर तोडफोड करणाºया आरोपीसोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे दिसून आले.

The search for the vandals outside the palace continues | ‘राजगृह’बाहेर तोडफोड करणाऱ्याचा शोध सुरूच

‘राजगृह’बाहेर तोडफोड करणाऱ्याचा शोध सुरूच

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे फुलझाडांच्या कुंड्या आणि खिडक्यांच्या काचांची तोडफोड करणारा अजूनही मोकाट आहे. लवकरच त्याला अटक होईल, असे पोलिसांकड़ून सांगण्यात आले.        
७ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, घटनास्थळावर तोडफोड करणाºया आरोपीसोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे दिसून आले. संशयित म्हणून ताब्यात घेतलेली व्यक्तीच आरोपी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी संशयित उमेश जाधव (३५) याला अटक केली. तो परेलचा रहिवासी असून बिगारीकाम करतो. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्ही. घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य आरोपीबाबत माहिती मिळाली असून लवकरच तपासाअंती त्याला अटक करण्यात येईल.

Web Title: The search for the vandals outside the palace continues

टॅग्स :Mumbaiमुंबई