सुरक्षा अहवालाचा आखला आराखडा

By Admin | Updated: September 2, 2015 02:48 IST2015-09-02T02:48:59+5:302015-09-02T02:48:59+5:30

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेल्या अहवालातील माहिती अपूर्ण आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने सुरक्षा अहवालाचा एक

The schematic layout of the security report | सुरक्षा अहवालाचा आखला आराखडा

सुरक्षा अहवालाचा आखला आराखडा

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेल्या अहवालातील माहिती अपूर्ण आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने सुरक्षा अहवालाचा एक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात नमूद केलेले सर्व रकाने भरून पुन्हा ३ सप्टेंबरला अहवाल सादर करावेत, असे वैद्यकीय महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.
अनेक वैद्यकीय महाविद्यालयांनी फक्त सुरक्षा रक्षकांची संख्या,
अजून किती सुरक्षा रक्षक हवे
आहेत? इतकीच माहिती दिली होती. यावरुन सुरक्षेचा अंदाज येत नसल्याने एक नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन आराखड्यानुसार, सुरक्षा रक्षकांची संख्या, अतिरिक्त किती सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे? त्यांच्या वेतनासाठी
किती रुपयांचा खर्च आहे? सीसीटीव्ही आहेत का? किती? अजून किती ठिकाणी सीसीटीव्हींची आवश्यकता आहे? किती ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची आवश्यकता आहे? वॉकी टॉकी आहेत का? अजून किती वॉकी - टॉकीची आवश्यकता आहे? त्यासाठी किती खर्च येणार? अशी तपशीलावर माहिती महाविद्यालयांनी द्यावी असे नमूद केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
झालेली आहे. यामुळे डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी मार्ड संघटनेने केली होती. यानंतर ९ जुलैला पत्राद्वारे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांनी समितीची स्थापना करावी असे आदेश देण्यात आले होते. यानंतर या समितीने
संपूर्ण सुरक्षा अहवाल सादर करणे अपेक्षित होते. पण तसे न झाल्याने ही वाढीव माहिती मागवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The schematic layout of the security report