तौक्ते चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST2021-06-19T04:06:18+5:302021-06-19T04:06:18+5:30

झाडे लावा, झाडे जगवा, हेमा मालिनीसह अभिषेक बच्चन यांचाही मोहिमेत सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि ...

Save the life of the trees uprooted in the cyclone | तौक्ते चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या झाडांना जीवदान

तौक्ते चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या झाडांना जीवदान

झाडे लावा, झाडे जगवा, हेमा मालिनीसह अभिषेक बच्चन यांचाही मोहिमेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात तौक्ते वादळामुळे झाडे उन्मळून पडली असतानाच, त्याचे पुनर्रोपण करण्यासाठी तत्काळ मुंबई महापालिकेकडून पाऊल उचलण्यात आले. या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या के/वेस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी आणि त्यांच्या पथकाने पुढाकार घेतला. येथील वॉर्डमध्ये ३४८ झाडे पडली होती. मात्र, या मोहिमेंतर्गत झाडे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आता झाडे लावण्याच्या आणि झाडे दत्तक घेण्याच्या उपक्रमाने वेग पकडला आहे. याच उपक्रमांतर्गत बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनीही आपला खारीचा वाटा उचलला. त्यांनीही वृक्ष लागवड करत, नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून, झाडे दत्तक घेण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ही मोहीम २९ मे पासूनच सुरू झाली असून, बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते याची सुरुवात झाल्याचे महापालिकेच्या के/वेस्ट विभागाकडून सांगण्यात आले.

........................................

Web Title: Save the life of the trees uprooted in the cyclone