Running to break the dangerous tree and branches | धोकादायक वृक्ष व फांद्या तोडण्याची धावपळ
धोकादायक वृक्ष व फांद्या तोडण्याची धावपळ

मुंबई : अंधेरी पूर्व येथे शनिवारी संध्याकाळी वृक्ष कोसळून तीन पादचारी जखमी झाल्याच्या घटनेनंतर महापालिकेचे धाबे दणाणले आहे. पावसाळ्यात धोकादायक वृक्ष मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


पिनॅकल पार्क येथील वृक्षाच्या धोकादायक फांद्या काही दिवसांपूर्वीच तोडण्यात आल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. परंतु हा वृक्ष कोसळून ३८ वर्षीय सी. के. गोपाळकृष्णन गंभीर जखमी झाले तर अन्य दोन पादचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. पर्जन्य जलवाहिन्या विभागाने काम करताना या वृक्षाच्या मुळांना धक्का दिला, यामुळे ही दुर्घटना घडल्याचेही सांगण्यात येते.


मान्सूनला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेमार्फत धोकादायक वृक्षांची तपासणी करून खाजगी आवारातील वृक्षांसाठी संबंधित सोसायट्यांना नोटीस पाठविण्यात येते. असे २९.८ लाख वृक्ष मुंबईत असून यापैकी १५.६ लाख खाजगी आवारात आहेत. गेल्या वर्षी अशा दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अंधेरी येथे शनिवारी घडलेली दुर्घटना महापालिकेसाठी धोक्याची घंटा मानून धोकादायक वृक्ष व त्यांच्या फांद्या तोडण्यास सुरुवात झाली आहे.

१९ एप्रिल - दिनेश सांगळे यांच्यावर दादर येथील वृक्ष कोसळून मृत्यू.
२८ मे - वाळकेश्वर येथे वृक्षाची फांदी अंगावर पडल्याने ९१ वर्षांच्या लीला सुखी यांचा मृत्यू.
९ जून - दहिसर येथे दृष्टी मुंगरा या १३ वर्षीय मुलीचा ा मृत्यू.
१६ जून - यश देसाई यांचा मृत्यू


Web Title: Running to break the dangerous tree and branches
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.