राज्यभरात ४३ हजार २११ कोरोना रुग्णांची नोंद; दिवसभरात १९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:53 AM2022-01-15T07:53:00+5:302022-01-15T08:03:26+5:30

कोरोनामुळे आज १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यातील १ लाख ४१ हजार ७५६ नागरिक दगावले आहेत.

Registration of 43 thousand 211 Kovid patients in the state | राज्यभरात ४३ हजार २११ कोरोना रुग्णांची नोंद; दिवसभरात १९ जणांचा मृत्यू

राज्यभरात ४३ हजार २११ कोरोना रुग्णांची नोंद; दिवसभरात १९ जणांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई :  राज्यभरात शुक्रवारी ४३ हजार २११ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७१ लाख २४ हजार २७८ इतकी झाली आहे, तर दिवसभरात ३३ हजार ३५६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६७ लाख १७ हजार १२५ झाली आहे. सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

कोरोनामुळे आज १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यातील १ लाख ४१ हजार ७५६ नागरिक दगावले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७१ लाख २४ हजार २७८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

आज राज्यात २३८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यात पुणे मनपा १९७, पिंपरी चिंचवड ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई  प्रत्येकी ३,  मुंबई २ आणि अकोला १ अशा रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण १ हजार ६०५ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८५९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडले आहे.

Web Title: Registration of 43 thousand 211 Kovid patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.