कुरारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:01+5:302020-11-28T04:05:01+5:30

केईएम रुग्णालयाने दिली पोलिसांना माहिती \Sलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शुक्रवारी एकाला अटक करण्यात आली. ...

Rape of a minor girl in Kurar, | कुरारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार,

कुरारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार,

केईएम रुग्णालयाने दिली पोलिसांना माहिती

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शुक्रवारी एकाला अटक करण्यात आली. कुरार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना केईएम रुग्णालयाने याबाबत माहिती दिली होती.

कुरार परिसरात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीला किडनीच्या उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरने तिला तपासले तेव्हा ती सहा महिन्यांपासून गरोदर असल्याचे त्यांना समजले. तेव्हा रुग्णालय प्रशासनाने याची माहिती कुरार पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता, ती अनाथ असून नाशिकला तिच्या आजीसोबत राहत असल्याचे समजले. त्याच ठिकाणी शेजारी आरोपी त्याच्या ७५ वर्षीय आजोबा व दोन भावांसोबत राहायचा. या तीन भावंडांपैकी एकाशी पीडितेचे लग्न लावून देण्याची विनंती आजीने त्यांना केली होती. आजीच्या मृत्यूनंतर पीडित आरोपीच्या घरी राहू लागली तसेच त्यांच्याकडे घरकाम करू लागली. त्या दरम्यान आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यातच ती गरोदर राहिली. पोटदुखीसाठी तिला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला, असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape of a minor girl in Kurar,