Ram Kadam, Avadhut wagh as BJP spokesperson; The name was not on the list two days ago | भाजपच्या प्रवक्तेपदी राम कदम, अवधूत वाघ कायम; दोन दिवसांपूर्वीच्या यादीत नव्हते नाव
भाजपच्या प्रवक्तेपदी राम कदम, अवधूत वाघ कायम; दोन दिवसांपूर्वीच्या यादीत नव्हते नाव

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तापदी आमदार राम कदम आणि अवधूत वाघ यांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी प्रवक्ता पदाची एक यादी जाहीर केली त्यात या दोघांची नावे नव्हती.
वादग्रस्त विधानांमुळे या दोघांची हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते, पण आज त्यांना प्रवक्तेपदी कायम ठेवत चंद्रकांत पाटील यांनी प्रवक्त्यासह सर्वांना धक्का दिला. माधव भंडारी हे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे सह मुख्य प्रवक्ते आहेत. तर काहीजण प्रवक्ते आहेत.
भाजप प्रदेश सचिवपदी राजेश पांडे यांची तर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी इजाज देशमुख (बीड) यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली. आज केलेल्या अन्य नियुक्ती अशा : प्रदेश व्यापारी आघाडी संयोजक झ्र महेशकुमार कुकरेजा (नागपूर) प्रदेश कामगार आघाडी संयोजक
गणेश ताठे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उदय पटवर्धन, औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ
नोंदणी प्रमुख शिरीष बोराळकर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ
नोंदणी प्रमुख मकरंद देशपांडे,
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ सहनोंदणी प्रमुखराजेश पांडे,
माध्यम सहसंपर्कप्रमुख ओमप्रकाश चौहान, माध्यम सहसंपर्कप्रमुख श्याम सप्रे, माध्यम सहसंपर्कप्रमुख सौमेन मुखर्जी.

Web Title: Ram Kadam, Avadhut wagh as BJP spokesperson; The name was not on the list two days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.