पावसाची रिपरिप सुरू

By Admin | Updated: June 20, 2015 23:15 IST2015-06-20T23:15:16+5:302015-06-20T23:15:16+5:30

तीन दिवसापासुन सुरू असलेल्या पावसाची रिपरिप शनिवारीही सुरू राहिली. दिवसभरात १०७ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.

Rainy rearranging continues | पावसाची रिपरिप सुरू

पावसाची रिपरिप सुरू

वसई : तीन दिवसापासुन सुरू असलेल्या पावसाची रिपरिप शनिवारीही सुरू राहिली. दिवसभरात १०७ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातही सरासरी ११३ मि. मि. पाऊस झाला. सकाळी अंधारून आल्यामुळे अनेक चाकरमानी घरी परतले. मात्र, कालच्या तुलनेत शनिवारी क मी पाऊस झाला.
दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तर समुद्रही शांत होता. शुक्रवारी दिवसभर समुद्रात लाटा उसळल्याने शनिवारीही तसेच होईल, असा अंदाज होता. परंतु समुद्रातील हवामान व पावसाची अल्प हजेरी यामुळे समुद्र शांत राहीला. ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली पण कालच्या प्रमाणे त्याचा जोर नव्हता. सायंकाळी ४ वा. च्या सुमारास पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सततच्या पावसामुळे शेतीला धोका निर्माण होतो. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. शहरी भागात आज दैनंदिन व्यवहार सुरळीत चालले होते. काल मुसळधार वृष्टी होउनही शहरी भागात कुठेही पाणी साचले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Rainy rearranging continues