मुलीचं 'इंडिया' नाव ठेवल्यानं जॉन्टी ऱ्होड्सची सोशल मीडियावर खिल्ली

By Admin | Updated: April 24, 2015 18:58 IST2015-04-24T18:58:37+5:302015-04-24T18:58:37+5:30

मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्सची सध्या सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडविली जात आहे.

Putting the name of the girl 'India', Jonty Rhodes wins on social media | मुलीचं 'इंडिया' नाव ठेवल्यानं जॉन्टी ऱ्होड्सची सोशल मीडियावर खिल्ली

मुलीचं 'इंडिया' नाव ठेवल्यानं जॉन्टी ऱ्होड्सची सोशल मीडियावर खिल्ली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्सची सध्या सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडविली जात आहे.
भारतात सध्या आयपीएल सामने सुरु असून मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच असलेल्या जॉन्टी आपल्या पत्नीसोबत भारत दौ-यावर आहे. २३ एप्रिल रोजी जॉन्टीच्या पत्नीने मुंबईत एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आपल्या मुलीचा भारतात जन्म झाल्याने जॉन्टीनं आनंद व्यक्त केला असून मुलीचं नाव 'इंडिया' असं ठेवल्याचं आपल्या चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. बेबी ऱ्होड्सतर्फे मुंबई इंडियन्सला गुड लक. इंडिया जिनी ऱ्होड्सचा जन्म दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला असून आई आणि बाळ दोन्ही सुखरुप असल्याचं जॉन्टीनं चाहत्यांसाठी ट्विट केलं. 'इंडिया' असं नाव ठेवल्यानं सोशल मीडियावर जॉन्टीची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर म्हटंले की, आता 'फादर ऑफ इंडिया, महात्मा गांधी नाही तर जॉन्टी ऱ्होड्स आहे असं म्हणावं लागेल. 'मैं इंडिया का बाप हूँ', असं म्हणण्याचं जाँटीला लायसन्स मिळालं आता, ' हू इज द फादर ऑफ इंडिया, नो...नो...इट्स नॉट महात्मा गांधी, इट्स जॉन्टी ऱ्होड्स. एकीकडे खिल्ली उडविली जात असताना अनेकांनी जॉन्टीच्या समर्थनार्थ कमेंटस करीत त्याचे कौतूकही केले आहे.

Web Title: Putting the name of the girl 'India', Jonty Rhodes wins on social media